राज्यपाल कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, थेट विमानातून उतरून परतले राजभवनात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. त्यात राज्यपाल कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान प्रवासाची परवानगी न दिल्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं कारण समोर आले आहे. या प्रवास संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावे लागले आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात वाद होताना दिसून येत आहे. विविध प्रश्नावर राज्यपालांनी आघाडी सरकारच्या अडचणी वाढवलेल्या आहेत. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असेही म्हटले होते. तर राज्यपालांच्या झालेल्या अपमानावर विरोधकांनी आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

Team Global News Marathi: