मुंबई | अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात येतोय.
या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळतायत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
मनसेचे सचिन मोरे यांनी एक ट्वीट केलं आहे. याट्वीटमध्ये त्यांनी बृजभूषण सिंह आणि शदर पवार यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…” तसेच मनसे नेते गजानन काळे यांनी हे ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, “”ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे … ( फोटो झूम करून पाहावा…)” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.