नाना पटोलेंना लहान म्हणणाऱ्या शरद पवार पाठोपाठ संजय राऊतांनी सामनातुन लगावला टोला |

 

मुंबई | – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यावरून सुरू असलेला स्वबळाच्या नार्यावर आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपावरून त्यात शरद पवारांनी नाना पाटोळे यांच्यावर केलेल्या भाष्यवर आजच्या सामना अग्रलेखातून शविसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता.

भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! असे शिवसेनेनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे नानांना लहान माणसे संबोधत शरद पवारांची री… ओढण्याचं काम शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलंय.

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालत असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: