भंगार सायकलीचे रुपडे पालटणारा सायकल कारागीर आणून द्या जुनी सायकल घेऊन जा आधुनिक सायकल!

भंगार सायकलीचे रुपडे पालटणारा सायकल कारागीर
आणून द्या जुनी सायकल घेऊन जा आधुनिक सायकल!

सोलापूर : आजकाल स्टायलिश दुचाकी वाहन खरेदी करण्याकडे प्रत्येकाचा कल आहे. काहीजण जुन्या गाड्यांना नवे लूक देण्याचा प्रयत्न करत असतो. जसे गाड्यांना नवा लूक मिळतो तसेच सायकलींनाही हवा तसा लुक देण्याचे काम एक सायकल कारागीर देत आहे. भंगार सायकलींना स्टायलिश लूक देणार्‍या या अवलियाचे नाव अाहे म. फारूक सय्यद. सातवी पास असलेले फारूक सय्यद यांचे गुरुनानक चौकात फारुख सायकल मार्टचे दुकान आहे.

आपल्या कल्पनाशक्ती मधून फारुकी यांनी जुन्या भंगार सायकलींना नवा स्टायलिश लूक देण्याचे काम करतात.  फारूक सय्यद यांची कला शहराबरोबर राज्यातही गाजत आहे. जुनी सायकल हवी तशी तयार करून घेण्यासाठी दूर दूरहून लोक त्यांच्याकडे येत आहेत. त्यांच्या कलेची चर्चा सर्वत्र होत आहे. कुर्बान हुसेन नगर शहरातील रहिवासी असलेले फारुख यांच्या वडिलांचे पूर्वी सायकल रिपेअरिंगचे दुकान होते. तिथे त्यांच्या मामांकडून त्यांनी सायकल रिपेअरिंगचे सारे काम शिकून घेतले.

नवे काही तरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्यांनी तयार केली. फारुख यांनी जुन्या सायकलींचे बदललेले रूप पाहून ती सायकल एका मोठ्या कंपनीतून बनवून आणली आहे असाच भास होतो. सायकलींना बसवण्यात येणारे स्टायलिश हँडल, शीट, त्याला देण्यात येणारे कलरिंग, विविध कंपनीचा लोगो स्टीकर हे स्वत: तयार करतात. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे सायकलींना लूक देतात.

यापूर्वी आपण एक चैनची सायकल पाहिली असेलच पण फारुखी यांनी दोनच चैनची सायकल तयार करून अापल्यातील किमया दाखवली आहेत. ही कला अवगत करण्यासाठी खूप वर्षे त्यांनी मेहनत घेतली. त्यांच्या यशला फळ मिळाले. दोन चेैन असलेल्या या सायकलींना मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे उतरत्या वयात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सायकल चालवणे अवघड जाते. त्यामुळे अशा दोन चैनीच्या सायकली असल्यास सायकल चालवणे सोपे जाते.

नवनवे प्रयोग करण्याचा विचार करतो

भंगाराकडे जाणाऱ्या सायकली अगदी कमी किमतीत विकत घेतल्या जातात. त्याच सायकलींना अाधुनिकतेचे रूप देण्याचे काम मी करत असतो. आतापर्यंत मी पाच हजारहून अधिक सायकलींना नवा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल चैन असलेल्या सायकलींना डबल चैन लावली तर त्या सायकली वेगात धावू शकतात. सायकल चालवून पाय थकले तर हाताने सायकल चालवू शकतो अशी नवी सायकल देखील मी तयार केली आहे. आणखीनच नवनवे प्रयोग करण्याचा विचार करत आहे असे सायकल कारागीर म. फारूक सय्यद यांनी सांगितले

ग्लोबल न्युज नेटवर्क: