अमृता फडणवीसांच्या गाण्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक

अमृता फडणवीसांच्या गाण्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक

ग्लोबल  न्यूज : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस विविध खोचक ट्विटमुळे अनेकवेळा सोशल मीडियावर चर्चेत असतात. अलीकडे त्यांच्या गाण्यामुळे त्या खूपच चर्चेत आल्या होत्या. या गाण्याची अनेकांनी खिल्ली सुद्धा उडवली होती तर या गाण्यावर डिस-लाइकचा पाऊसच पडला होता. मात्र ठाकरे सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मिसेस फडणवीसांच्या या गाण्याचे तोंड-भरून कौतुक केले आहे.


भाऊबीजेच्या मुहूर्तावर त्यांचे एक गाणं यू ट्यूबवर रिलीज झाले होते. ‘बेटी बचाव’चा संदेश देणाऱ्या या गाण्याचा मुखडा ‘तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या,’ असा आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाणं संगीतप्रेमींना फारसे आवडलेले नव्हते. तसेच दिग्दर्शक महेश टिकेकर यांनी तर फेसबुकच्या माध्यमातून टीका सुद्धा केली होती.

मात्र हे सर्व अपवाद वगळता मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत अमृता फडणवीस यांना शुभेच्छा दिलाय आहेत. ‘सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!,’ असं ठाकूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: