सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. मलिक यांच्या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला टोला लगावला आहे.भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत.
त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,’ अशी टीका कंबोज यांनी केली आहे.
पुढे म्हणाले की, भाजपवर टीका करणाऱ्या मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.