कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केले जाणार नाही – सुप्रिया सुळे

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केले जाणार नाही – सुप्रिया सुळे

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले होते. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. अशी टीका काँग्रेस नेते केली होती. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळते, असे नाते आहे . कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळे केले जाणार नाही, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे, मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केले जाणार नसल्याचे ही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले आहे.

बारामती मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदानासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्यावेळी त्यांनी पत्रकार मद्यमांशी संवाद साधला होता. सरकार पडणार असल्याचं विरोधक म्हणत असल्याचं विचारलं असता त्या म्हणाल्या, संघटना आणि कार्यकर्ते नीट ठेवण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतं, त्यांना सरकारविरोधात बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून सरकार पडणार असं बोलतायत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. – सुप्रिया सुळे

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले होते. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. अशी टीका काँग्रेस नेते केली होती. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: