शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेंदीनी कॅनडाच्या पंतप्रधानांना चांगलेच सुनावले खडेबोल

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेंदीनी कॅनडाच्या पंतप्रधानांना चांगलेच सुनावले खडेबोल

केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी चांगलासह आक्रमक झाले आहेत.
हे काळे कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. देशात कृषी कायद्यविरोधात सुरु असलेल्या या आंदोलनात आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी भाष्य केले आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात भाष्य करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहे.


जस्टिन त्रुडो यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या खासदार प्रियाने चतुर्वेदी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे.

“जस्टिन त्रुडो तुमची अडचण आम्ही समजू शकतो, पण भारताचा अंतर्गत विषय हा दुसऱ्या कुठल्या देशाच्या राजकारणासाठी चारा नाही. त्यामुळे आम्ही ज्या प्रमाणे दुसऱ्या देशाच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तसाच तुम्ही सुद्धा शिष्टाचाराचा आदर करा असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या देशांनी यावर आपला सल्ला देण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी ही कोंडी फोडावी अशी विनंती प्रियंका चतुर्वेदींनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: