अंगदुखी गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे पडू शकत महागात ?

 

मुंबई | डोकंदुखी, हात-पाय दुखणे किंवा शरीरात कुठेही वेदना होत असतील तर अनेकजण सोपा मार्ग म्हणून पेन किलर औषधे घेतात. मात्र लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. पण असे दीर्घकाळ केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याबाबत झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार अनेक संशोधनांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, सतत पेनकिलर खाल्ल्याने नंतर या औषधांचा काहीच परिणाम दिसून येत नाही. शिवाय दीर्घकाळानंतर त्यांचे दुष्परिणामही दिसू लागतात. पेनकिलर आपल्या आरोग्याला कशी हानीकारक आहे, त्याची माहिती जाणून घेऊया.

पॅरासिटामॉलशी संबंधित वेदनाशामक औषधांमुळे यकृताला नुकसान होण्याची शक्यता असते. पॅरासिटामॉलमुळे शरीराच्या चयापचयाद्वारे तयार होणारे पेरोक्साइड यकृतासाठी विषारी घटक बनू शकतात. पोटदुखी आणि अल्सर इबुप्रोफेन, ऍस्पिरिन आणि नेप्रोक्सेन यांसारखी वेदनाशामक औषधे पोटाच्या अस्तरांना हानी पोहचवू शकतात. जर तुम्हाला आधीच अल्सरची समस्या असेल तर या स्थितीत रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

नैराश्य वेदनाशामक औषधे नैराश्यावर उपचार करणाऱ्या औषधांची प्रभाविता कमी करतात. जे लोक एंटिडप्रेसस घेतात त्यांनी वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर टाळावा किडनी निकामी होण्याचा धोका मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक जे नियमितपणे ibuprofen आणि naproxen सारख्या वेदनाशामक औषधांचा वापर करतात त्यांना मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांना आधीच किडनीची समस्या आहे त्यांना जास्त धोका असतो.

Team Global News Marathi: