ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर

 

डायबिटिज टाईप 1 किंवा टाईप-२ असो, साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी ही सर्वात मोठी चिंता असते. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार 2025 पर्यंत डायबिटिजच्या रुग्णांची संख्या 170 टक्क्यांनी वाढेल. टाईप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तीचे इन्सुलिन हार्मोन योग्यरित्या कार्य करत नाही. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. या स्थितीत रुग्णाची किडनी निकामी होण्याचीही शक्यता असते.

रुग्णांना मज्जातंतूच्या वेदना, पायात अल्सर, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. अशावेळी आहार योग्य ठेवला तर डायबिटिज टाईप 2 चा धोका टळू शकतो. डायबिटिज टाईप 2 टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा ते जाणून घेऊया

तेलकट सेवन करू नका
तज्ज्ञांचा सल्ला आहे की डायबिटिज टाईप 2 च्या रुग्णाने त्याच्या आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या आजारात, सर्व काही खाण्याऐवजी, आपण काही मर्यादित अन्न घ्यावे. आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी फळे, हिरव्या भाज्या धान्ये खावीत. डायबिटिजच्या रुग्णांनी मीठ कमी प्रमाणात खावे.

दुधी भोपळ्याचा करा आहारात समावेश
टाईप-2 डायबिटिज असलेल्या रुग्णांसाठी दुधी भोपळा हा सर्वोत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये 92 टक्के पाणी आणि 8 टक्के फायबर (Fiber) असते. या रोगाशी लढण्यासाठी दुधी भोपळा ही सर्वात प्रभावी भाजी आहे. कारण दुधी भोपळ्यामध्ये ग्लुकोज आणि साखर कमी प्रमाणात आढळते.

संशोधनात असेही आढळून आले आहे की दररोज आपल्या आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने रक्तातील साखर कमी होते. दुधी भोपळ्या ज्यूस, दुधी भोपळ्याची भाजी मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात प्रोटीन-टायरोसिन फॉस्फेट 1 बीटा आढळून येते, जे इन्सुलिन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

सोडा धूम्रपान आणि करा व्यायाम
डायबिटिजच्या रुग्णांनी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. दररोज अर्धा तास व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही सिगारेट आणि दारूचे सेवन करत असाल तर लवकरात लवकर या गोष्टींचे सेवन बंद करा. अतिरिक्त अल्कोहोल चरबी वाढवते, ज्यामुळे तुमचा रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड पातळी

जास्त पाणी प्या
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्हाला डायबेटिस जास्त असतो, तेव्हा किडनी तुमच्या रक्तातून साखर घेऊ लागते. अशावेळी जर तुम्ही पाणी योग्य प्रमाणात प्यायले नाही तर पाण्याअभावी किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जास्त पाणी प्यायल्याने तुमची किडनी सुरक्षित राहते आणि तुम्ही कोणताही धोका टाळू शकता.

Team Global News Marathi: