‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट चालेल पण बरबाद करणारे रंग नकोत’ बद्रिकेची पोस्ट होतेय वायरल

 

अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेला दिसून आला आहे त्याच्या अनेक पोस्ट वायरल झालेल्या दिसून आल्या आहेत अशातच आता पुन्हा एकदा कुशल बद्रिकेने नुकतीच एक इन्स्टा पोस्ट केली आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. कुशलनं इन्स्टावर त्याचे काही ब्लॅक अॅण्ड फोटो शेअर केले आहेत.

कुशलने हे फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की, एखाद्या फोटो मधले रंग “burst” झाले की तो फोटो घाणेरडा दिसतो, मग त्या फोटोला black and white करायचं, तोच फोटो एकदम भारी दिसायला लागतो. ”आयुष्याचही तसंच आहे ,black and white चालेल पण बरबाद करणारे रंग नकोत” ! त्याच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय त्याचा हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट अंदाज देखील चाहत्यांना भलताच आवडलेला आहे.

आजवर आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिकेने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रचंड मोठा असा चाहतावर्ग देखील आहे. चाहत्यांना तो आपलासा असा वाटतो. त्याच्या या अभिनयाबद्दल चाहते भरभरून बोलतात. कुशलला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं स्वत: जितकी मेहनत घेतली तितकीत त्याच्या आईनं आणि पत्नीनं घेतल्याचंही तो सांगतो.

Team Global News Marathi: