कल्याण | कल्याण पश्चिमेकडील भाजपाचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्याला ५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेला कल्याण पश्चिमेकडील भाजपाचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक सचिन खेमावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची जंत्री पाहता ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. भाजपा माजी नगरसेवक सचिन खेमा हा कल्याण रेल्वे स्थानक भागातील नगरसवेक होता. त्याने कल्याणमधील छत्री व पतंगाचे व्यापारी अमजद सय्यद याला ५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी सचिन खेमा याला गेल्याच आठवड्यात अटक केली. तेव्हापासून तो आणि त्याचे साथीदार आधारवाडी कारागृहात बंदिस्त आहेत. तर दुसरीकडे सचिनच्या सुटकेसाठी भाजपा नेत्यांनी पोलिसांनी खोट्या गुन्हयात गोवल्याचे सांगत शनिवारी पोलीस अप्पर आयुक्तांच्या कार्यलयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले.
मात्र, पोलिसांनी त्यांना मोर्च्याची परवानगी नाकारून जर जबरदस्ती मोर्चा काढण्यास कारवाई केली जाईल, अशा नोटीस बजावल्या होत्या. त्यामुळे कोणीच भाजप नेता पुढे आला नाही, त्यामुळे भाजपचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.