भाजपचे जिंदल काय बंडल यांनी पवार साहेब यांची माफी मागावी -हसन मुश्रीफ

कोल्हापूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयाच्या हप्ता वसुलीचा आरोप लावणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घणाघाती टीका केली आहे.

परमबीर सिंह हे भाजपाचे डार्लिंग आहेत भाजपचे जिंदल काय बंडल यांनी पवार साहेब यांच्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असंही हसन मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले की, भाजपने या विषयावर तात्काळ माफी मागावी नाहीतर आमच्याकडूनही अशी वक्तव्य करण्यात येतील. लाज वाटत नाही का या जिंदालला पवार साहेब यांच्यावर बोलायला. दोन दिवसात माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.

पुढे पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुश्रीफ म्हणाले की, मोदी आणि शाह एका महिलेला हरवण्यासाठी मागे लागले आहेत.

परमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते असं सांगत मुश्रीफ म्हणाले की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. आता देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत, ते का आता बोलत नाहीत. परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशी देखील केली नाही असा आरोप करत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

Team Global News Marathi: