कॉन्टक्ट ट्रेसिंग शून्य असल्याने राज्यात कोरोना वाढतोय, मनसे आमदार राजू पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा महाराष्ट्राला लॉकडाउनच्या दिशेने घेऊन जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी ठाकरे सरकारला टार्गेट केले जात आहे.
“राज्य सरकार कॉन्टक्ट ट्रेसिंग बद्दल एकदम शून्य आहे. त्यामुळे अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्याने कोरोना वाढतो. हे सरकारचे अपयश आहे,” अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

सुरुवातीपासून कोरोना आजाराविषयी नागरिकांध्ये संभ्रम होता. बाधितांची नावे जाहीर केली जात नाही. मात्र आत्ता तशी परिस्थिती नाही. सरकारने रोजच्या रोज कोरोना बाधितांची यादी जाहीर करावी. तशा प्रकारचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावे. कोरोना बाधितांची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करुन घेण्यास पुढे येतील.

तसेच अन्य लोकही सावध होतील. त्याचबरोबर कोरोनाची आकडेवारी येत आहे. ती खोटी की खरी याची शहानिशा होण्यास मदत होईल. कोरोना वाढतोय म्हणून सरसकट सामान्य जनतेला लॉकडाऊनमध्ये ढकलण्यापेक्षा जे बाधित व संपर्कात आलेले आहे. त्यांच्यावर लक्ष देण् सोपे होईल. कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छ ठाकरे सरकारची आहे असे मानून सरकार निर्णय घेईल, असा टोला सुद्धा आमदार पाटील यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: