भाजपाची देशव्यापी आंदोलनाची हाक, खासदार  प्रियांका चतुर्वेदी यांनी संताप केला व्यक्त ! 

 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या आरोपानंतर मोठया प्रमाणात हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्याचे समोर आले होते. तसेच अनेकांना या हिंसाचारात आपला प्राण सुद्धा गमवावा लागला होता. पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.

मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटात सुद्धा राजकारण करत भाजपने दिलेल्या आंदोलनविरोधात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.  देशाने अजून करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव पाहिलेला नाही, त्यामुळे भाजपानुसार अशा सुपर स्प्रेड धरणे कार्यक्रमांची गरज आहे. नाही का? असा टोला लगावत भाजपच्या स्टन्डबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा ४ आणि ५ मे रोजी पश्चिम बंगालचा दौरा करणार असून पक्ष कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हुगली जिल्ह्यात पक्ष कार्यालयाला आग लावली तसंच ममता बॅनर्जींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा भाजपाचा आरोप आहे.

Team Global News Marathi: