तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागाल -रुपाली पाटील-ठोंबरे

तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल -रुपाली पाटील-ठोंबरे

पुणे : भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या विडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केलाय. त्याचसोबत ट्विटरवर नाना पटोले यांनी टॅग करत “नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेल मध्ये” असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांच्या ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल अस कुठे करतात का चित्रा ताई? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

मुळात तुम्हाला नाना पटोले यांच्या खासगी आयुष्यातील विडिओ ट्विट टाकण्याचं प्रयोजन काय? तो तथाकथित व्हिडीओ खरा आहे खोटा आहे त्याची पडताळणी केली का , त्या महिलेने तुम्हाला कोणतीही तक्रार केली का ? तिला कोणताही त्रास झाला असता आणि त्या महिलेने तुम्हाला तक्रार केली असती तर गोष्ट वेगळी होती.

 

मात्र तुम्हाला विरोधी पक्षनेत्याच्या खासगी आयुष्यात सातत्याने ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेले नाही आहे अशे खडे बोल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना सुनावले आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: