महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच भाजपने सुशांत सिंहच्या आत्महत्येचा वापर केला – सचिन सावंत

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करून आज एक वर्ष उलटली आहे. मात्र अद्यापही सुशांतची हत्या की आत्महत्या या गोष्टीचा छडा लावण्यास यश आलेले नाही याच मुद्द्यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तसेच विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष झाले, परंतु आजपर्यंत सुशांतच्या बाबतीत सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत आलेली नाही. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच सुशांत सिंह प्रकरणाचा गैरवापर भाजपने केला, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

सुशांतची हत्या की आत्महत्या याचा तपास करणाऱया सीबीआय चौकशीला आज ३१० दिवस व एम्स पॅनेलने सुशांतच्या हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे, असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केले. सीबीआयवर दिल्लीतील राजकीय वरिष्ठांचा प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सुशांत राजपूतने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी तपासातून समोर आले होते. सुप्रीम कोर्टानेही तो तपास योग्यच होता असे म्हटले आहे. भाजपने या आत्महत्येला राजकीय रंग देत त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला होता. सुशांत प्रकरणात ड्रग कनेक्शनही उघड झाले होते. त्याचे धागेदोरे भाजपच्या अत्यंत जवळच्या लोकांपर्यंत असल्याचे आम्ही पुराव्यानिशी वारंवार उघड केले, परंतु सीबीआय अथवा एनसीबीने त्याचा छडा लावला नाही, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: