भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नंतर आता दिल्लीत दखल होणार देवेंद्र फडणवीस

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चनदरकणात पाटील यांच्या पाठोपाठ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता की अचानक हा दौरा ठरला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांना आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांनाही विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं त्यांनाही राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाल्याने संघटनात्मक बदल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आता देवेद्र फडणवीस दिल्लीत कुणा-कुणाची भेट घेतात हे पहावं लागेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत शाह-पाटील यांच्या भेटीची माहिती दिली आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील याबाबतची माहिती दिली होती.

Team Global News Marathi: