भाजपाच्या जेष्ठ नगरसेवकाला चार अल्पवयीन मुलांनी केली मारहाण

मिरभाईंदर : भारतीय जनता पक्षाचे मीरा भाईंदर महानगर पालिकेचे जेष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना किरकोळ वादातून चार अल्पवयीन मुलांनी मारहाण केली आहे. रस्त्यावरून बाईक वेगाने चालवण्यावरून रोखल्यामुळे चार अल्पवयीन मुलांनी लाथाबुक्यांनी पाटील यांना मारहाण केली आहे.

सदर घडलेल्या प्रकरणावरून पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. पाटील यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रोहिदास पाटील हे पत्नी, सून, नातू, नात अशा परिवारासोबत राहतात. भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क परिसरात नगरसेवक रोहिदास पाटील यांचा बंगला आहे. या बंगल्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी ते गेले होते.

रोहिदास पाटील गेटवर उभे असताना तीन मुलं लाल रंगाची स्कूटीवर भरधाव वेगाने वाकडी-तिकडी चालवत असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे पाटलांनी त्यांना हटकून वेगाने गाडी न चालवण्यास सांगितलं. त्यावेळी चिडलेल्या एका तरुणाने “तेरे बाप का राज है क्या, तू हमे बोलनेवाला कौन हे, तू तेरा देख, मै मेरा देखता हू” अशा शब्दात उत्तर दिल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: