“बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचनालयाने कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे व व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांना जोरदार धक्का देत ईडीने त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली. पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पाटणकरांच्या कारवाईवरून मुख्यमंत्र्यांना पुरतं घेरलं आहे.

इतिहास सांगतो की, मनोहर जोशी यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हाच नियम इथे लागू होतो की शिवसैनिकांचे नियम वेगळे आहेत? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तर पाटणकरांवरील कारवाई सूडबुद्धीने झाली असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला शिवसेना काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: