“ज्यांच्यापर्यंत हे धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, अजित पवारांचे स्पष्ट संकेत

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली होती. सध्या या प्रकरणी एनआयए खोलात जाऊन तपास करत आहे.

यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. सचिन वाझे प्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे आघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ देणार नाही, असे अजित पवारांनी बोलून दाखविले आहे.

पुढे अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांवर काही चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यावेळी संध्याकाळपर्यंत कारवाई करुन अटक केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार संध्याकाळी ही कारवाई केली गेली. त्याच पद्धतीने ही कारवाई केली जाईल. यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. हीच सरकारची भूमिका आहे असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Team Global News Marathi: