भाजप यापुढची निवडणुका स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार – आशिष शेलार

 

राज्यात आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष आघाडी सरकारवर खासकरून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर पाश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देऊन विरोधकांना खुले आव्हान दिले आहे.

कितीही संपर्क अभियाने राबवा आणि विस्तार करा. भाजप या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष कार्यालयात शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची त्यांनी बैठक घेतली.

ते म्हणाले या पुढच्या काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे आपले बलस्थान असलेली बूथ रचना आणखी मजबूत करा. घराघरांमध्ये भाजपचे सेवा कार्य पोहोचले पाहिजे.

तसेच शिवसेनेच्या संपर्क अभियानाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ह्यावेळी कोणीही कितीही अभियाने करोत, पण आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार. ईडी, इन्कम टॅक्सचे अधिकारी गुन्हेगारांच्याच मागे लागतात; परंतु निष्कारण याबाबत भाजपवर आरोप केले जात आहेत.

Team Global News Marathi: