‘ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले होते. तसेच नाव न घेता माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा असून नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. आता पंकजा मुंडे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडवीसांना टोला लगावला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका” असे त्यांनी म्हंटले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा सुरू होती. परंतू त्यांना कोणतही पद मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वरळी कार्यालयात चर्चा केली आणि त्यांचे राजीनामेही नामंजूर केले. यामुद्यावरून सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षनेत्यांवर चांगलाच निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

Team Global News Marathi: