भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान, रावणाने सीतेचे अपहरण करून मोठा गुन्हा केला नाही !

 

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून आपल्या आणि पक्षाच्या अडचणी वाढवण्याचे काम करताना अनेकदा दिसून आले आहेत अशातच राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधआनसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब चंद कटारिया हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. बोहेडा येथील जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना कटारिया यांनी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाची पत्नी माता सीतेबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

रावणाने सीतेचे अपहरण करून मोठा गुन्हा केला नाही, कारण रावणाने कधीही सीतेला स्पर्श केला नव्हता, असे कटारिया यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टिकेचा भडिमार होत आहे. उदयपूर जिल्ह्यातील वल्लभनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रणधीर सिंह भिंडर यांनी गुलाब चंद कटारिया यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला असून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. सीतेचे अपहरण करून त्याने काही मोठा गुन्हा केला नाही असे कटारिया यांनी म्हटले आहे. सीतेचे अपहरण हा एक सामान्य विषय होता. जर रावणाने सीतेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता, असे अकलेचे तारेही कटिराया यांनी तोडले आहेत.

गुलाब चंद कटारिया यांच्या विधानातून त्यांची मानसिकता दिसते. कटारिया रामायणालाच खोटे सिद्ध करू पहात आहेत. महाराणा प्रताप, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर, प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा हा अपमान आहे. अशा व्यक्तीवर बहिष्कार टाकायला हवा, असे रणधीर सिंह भिंडर यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: