भाजप खासदार वरुण गांधी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात तीन तास चर्चा

 

नवी दिल्ली | स्वपक्षीय पक्षावर नाराज असलेले खासदार वरून गांधी यांनी काल शविसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी रात्री ही बैठक झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन तास दोन्ही चर्चा झाली. संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही.

२५ वर्षे युतीमध्ये एकत्र राहिलेले शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रातील २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे झाले. मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली. आता दोनही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडल्याशिवाय राहत नाहीत. मात्र याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली.

माच्या काही काळापासून वरुण गांधी यांनी स्वत:ला भाजपपासून अलिप्त ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजपवर ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून वरुण गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपलाच घेरताना दिसत आहेत.

Team Global News Marathi: