भाजप खासदार नारायण राणेंना तातडीने दिल्लीत बोलावलं, मिळू शकत मंत्रिपद |

 

केंद्रातील नरेंद्र मोदी कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा असतानाच महाराष्ट्रातून सहा जणांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात शिवसेनेसोबत लवकरात लवकर युती व्हावी, यासाठी प्रयत्नही सुरु झाले आहे, तर दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणेंना दिल्लीतून बोलवणं आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून राणेंना फोन करण्यात आला होता. .

दरम्यान मोदी सरकार २.० मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. उद्या बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्री अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. ७ जुलै रोजी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. परंतु, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, यांच्या नावाची चर्चा आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. व्यतिरिक्त भूपेंद्र यादव , पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे यांचीही नावे चर्चेत आहेत.

Team Global News Marathi: