भाजपा नेते प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण

 

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढलं असून वाढत्या रुग्णसंख्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पुढाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे.

दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी., असे दरेकर यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत राज्याचे मोठ्या मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Team Global News Marathi: