जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर बुधवारी मोर्चा येणार असल्याचे स्वतः ट्विटद्वारे सांगितले आहे. मोर्चा पुण्यावरून येत असल्याचा उल्लेख करत पोलिसांना वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. तसेच, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी रात्री उशिरा ट्विटद्वारे म्हटले आहे की, “उद्या (बुधवारी) माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा……. जय भीम!”

दरम्यान, ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने नुकतेच ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत विधान केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती.

Team Global News Marathi: