भाजपा नेते आशिष शेलार यांची पुन्हा आघाडी सरकारवर घणाघाती टीका

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. त्यात याच मुद्द्याला धरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला.करोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले..राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी! महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा करोनाने डोकेवर काढले! असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असे म्हटले आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Team Global News Marathi: