भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारची डोकेदुकी वाढवत आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असताना दुसरीकडे राज्यातील आजी-माजी नेत्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

आता राज्यातील आणखी एका माजी मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. फडणवीसांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. एकीकडे जळगावात महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असताना दुसरीकडे महाजन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भाजपा आता दुहेरी संकटात सापडलेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन यांना ताप होता. सोमवारी ते मुंबईला रवाना झाले होते. तर मंगळवारी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती भाजपच्या पदाधिकऱ्यांकडून मिळाली आहे.

महाजन यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी रुग्णालयातूनच गिरीश महाजन राजकीय सूत्रं हलवत आहेत. तसेच काही नगरसेवकांशी देखील ते संपर्कात असल्याचे समजते.

Team Global News Marathi: