भाजपा खासदार शर्मा यांची दिल्लीत गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : खासदार मोहन डेलकर यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने नवी दिल्ली येथे शासकीय बंगल्यात पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. भाजपा पक्षाचे हिमाचल प्रदेश येथील खासदार राम स्वरूप शर्मा यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार साफसफाई कर्मचारी त्यांच्या खोलीची साफसफाई करण्यासाठी गेलेले असताना आवाज देऊनही शर्मा यांनी आतून दरवाजा खोलला नव्हता त्यामुळे तात्काळ कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळविली. पोलिसांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा खोलताच पंख्याला शर्मा यांचा  मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

राम स्वरूप शर्मा हे भाजपाचे खासदार असून, ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचे निवासस्थान आहे. याच खासदार निवासात ६२ वर्षीय शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

या संदर्भात कर्मचाऱ्याने सांगितले की, शर्मा यांच्या खोलीचा दरवाजा कर्मचारी उघडण्यास गेलो, तेव्हा दरवाजा आतून बंद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना मी आवाज दिला. वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हते. म्हणून आम्ही पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी खोलीत शर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Team Global News Marathi: