मेरठमध्ये शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा लोकांनी मेडिकल स्टेशनच्या भिंतीवर एक मोठा बॅनर लटकलेला पाहिला.बॅनरवर ‘भाजप कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्यास मनाई आहे असे लिहिले होतं. या बॅनरवर स्टेशन प्रभारी संत शरण सिंह यांचे नाव लिहिले होते. पोलीस स्टेशनबाहेर टांगलेल्या या बॅनरला ट्विट करून सपा नेते अखिलेश यादव यांनी राज्यातील योगी सरकार ताशेरे ओढले.
‘हा आहे यूपीच्या भाजप सरकारचा बुलंद इक्बाल’ अखिलेश यादव यांनी ट्विट करून लिहिलं की, ‘या पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनवर लटकवलेले बॅनर अन्य कोणी नसून खुद्द भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते.
भाजप कार्यकर्त्यांनी इन्स्पेक्टर संत शरण सिंह यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यातून त्यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर पोलीस लाईनमधून पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या सीओने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांना शांत केले आणि पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून वादग्रस्त बॅनर हटवला. मात्र या बाणेंरचीस अर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली होती .