“भाजपाला तीन वर्षांत भारताबाहेर काढायचं माझं ध्येय आहे”

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला दणदणीत पराभव करून विजय मिळवला होता. मात्र आडपही तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा थेट भाजपाला आव्हान दिले आहे.

येत्या तीन वर्षांत देशाच्या बाहेर काढण्याचा निश्चय तृणमूल काँग्रेसनं केला असून तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी स्थानिक पोटनिवडणुकांच्या प्रचारादरम्यान ही घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुका होत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात देखील पोटनिवडणूक होत आहे.

यादरम्यान, मुर्शिदाबाद मतदारसंघात प्रचार करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाला देशाबाहेर काढण्याचं लक्ष्य असल्याचं जाहीर केलं आहे मुखर्जी आज पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये प्रचार करत होते. या ठिकाणी मुर्शिदाबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान उमेदवाराचाच मृत्यू ओढवल्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक स्थगित करण्यात आली होती. तिथे आता पोटनिवडणूक घेतली जात आहे.

Team Global News Marathi: