किरीट सोमय्या यांना विरोध करू नका; हसन मुश्रीफ यांची जनतेला विनंती

 

कोल्हापूर | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा येत्या २८ सप्टेंबरला कोल्हापुरात येण्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांच्या या निर्याणानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुश्रीफ समर्थकांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. त्यातच यावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिकिया दिलेली आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलेले आरोप चुकीच्या व ऐकीव माहीतीवर आधारलेले आहेत.

ते पुढे म्हणाले की, आम्ही याबद्दल योग्य ती कागदोपत्री कारवाई करूच. पण माझ्यावर प्रेम करणारया जनतेने संयम ठेवावा. जो पर्यंत तुम्ही लोक आणि प्रमेश्वर माझ्या पाठीशी आहात तो पर्यंत मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. किरीट सोमय्या यांना कागल तालुक्यात येऊ द्या. विरोध करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंधरा दिवसानंतर ते गुरूवारी रात्री उशिरा कागलमध्ये आले. म्हणुन त्यांना भेटण्यासाठी मतदार संघातील लोक आज पहाटेपासून त्यांच्या निवासस्थानी झुंडीने येत होते. ग्रामीण महिलांची तसेच तरूणांची संख्या लक्षणीय होती. मंत्री मुश्रीफ यांनी चार वेळा माईकवरून उपस्थितीतांशी संवाद साधुन संताप व्यक्त करणारया कार्यकर्त्यानां शांत करण्याचा व समजावण्याचा प्रयत्न केला. हे केवळ माझ्या विरोधात नव्हे तर महाविकास आघाडी सरकार विरुद्धचे षडयंत्र आहे. म्हणून सोमय्याकडे दुर्लक्ष करा. ते येणार त्या दिवशी टि व्ही बघु नका. शेतात जाऊन काम करा. सोमय्यांना आपल्या कागल तालुक्याचा विकासही पाहू द्या. अशा शब्दात त्यांनी उपस्थितांची समजूत काढली.

Team Global News Marathi: