राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार – रणजितसिंह निंबाळकर

 

 

शिवसेना पक्षाने भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांना जोरदार प्रयत्न सुरु केले होते. आज आघाडी सरकारला घेरण्यासाठी विविध मुद्द्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसून येत आहे. त्यात पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप सत्तेत येणार असल्याचं म्हटलंय.

मी पहिल्यांदाच खासदार झालो व अगदी कमी कालावधीत माझी मंत्रिपदाची शिफारस राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्येष्ठ असल्यानं त्यांना मंत्रीपद मिळाल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं आहे.

अल्पावधीतील माझ्या कामामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव पुढं केले होते. मला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून मी स्वतः ही नाराज नाही. कार्यकर्त्यांनीही होऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.

सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार माझ्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. केलेल्या कामांमुळे माझं नाव मंत्रीपदापर्यंत गेलं, त्याचा मला व जनतेला अभिमान आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी संपूर्ण मोदी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला होता.

Team Global News Marathi: