“भाजपकडून सरकारी यंत्रणांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला जात आहे” नवाब मालिकांचा आरोप

 

मुंबई | महाराष्ट्रातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यात नगरपंचायतींच्या बाबतीत राष्ट्रवादी तर वैयक्तिक जागांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. पण वैयक्तिक स्तरावरील जागांच्या बाबतीतही राष्ट्रवादीच अव्वल असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नबाव मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रात नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात ८० टक्के मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. ७५ टक्के जागांवर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला. आम्हाला २७ नगर पंचायतींमध्ये बहुमत मिळालं. इतर १० ठिकाणीदेखील आम्ही इतरांशी हातमिळवणी करून बहुमाताचा आकडा गाठू असे विधान त्यांनी केले होते.

तसेच भाजपावे टीका करताना ते म्हणाले की, भाजप म्हणत असेल की या निवडणुकांमध्ये सत्तेचा दुरूपयोग झाला आहे, तर ते थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. निवडणूक सुरू असताना भाजपकडून एकही आरोप करण्यात आला नाही. आता निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विविध आरोप केले जाऊ लागले आहेत. पराभवाला कसं सामोरं जायचं हे कळत नसल्याने पराभव लपवण्यासाठी भाजपकडून असली विधानं केली जात आहेत असे नवाब मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: