कोरोना संसर्गासारखे भाजप सरकार देशासाठी मोठे संकट – काँग्रेस आमदाराची टीका

कोरोना संसर्गासारखे भाजप सरकार देशासाठी मोठे संकट – काँग्रेस

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्वभुमीवर केंद्रात सतत असलेल्या भारीत्या जनता पक्षावर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत आहे. त्यातच काँग्रेस विधानपरिषेदेचे आमदार सुधीर तांबे यांनी सुद्धा भाजपावर कोरडार टीका केली आहे.

नोटबंदीचा घाईघाईत घेतलेला निर्णय, जीएसटी यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्यातच आता करोनाचे संकटाच्या भर पडली. खरे तर भाजप सरकार हेच देशावरचे मोठे संकट आहे,असा टोला आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपाला लगावला आहे. ते आज संगमनेर तालुक्यातील कार्यक्रमावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते.

यावरी थोरात म्हणाले की, थोरात म्हणाले, ‘एक वर्षापूर्वी तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. सत्तास्थापन मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यामध्ये काळ गेला. मार्चपासून आलेल्या करोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती मंदावली. करोना, निसर्ग चक्रीवादळ विदर्भातील पूर परिस्थिती आणि आता सततचा पाऊस यामुळे संकटा मागून संकट येत आहेत. तरीही लॉकडउनमध्ये उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असतानाही राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अशी दहा हजार कोटींची मदत शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जाहीर केली आहे. असे बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: