भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या क्लबवर मनपाची कारवाई

नियमाचे उल्लघन करून आणि नियम धाब्यावर बसवून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी बांधलेल्या ७११ क्लब विरोधात स्थानिकांनी अनेक तक्रारी मनपाकडे दाखल केल्या होत्या. तसेच या क्लबवर कारवाई करा अशी मागणी सतत नागरिकांकडून होत होती.

नागरिकांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून मीरा भाईंदर महापालिकेने देखील सदर क्लब परिसरात सीआरझेड व अन्यत्र मंजूर परवानगी पेक्षा झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे पत्र स्थानिक पालिका प्रभाग अधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे.

मीरारोडच्या कनकिया भागात कांदळवनचा ऱ्हास करून तसेच कांदळवन पासूनच्या ५० मीटर संरक्षित क्षेत्रात, सीआरझेड, पाणथळ, उच्चतम भरती रेषा व नाविकास क्षेत्रात बेकायदेशीर भराव – बांधकाम करून ७११ हॉटेल्स कंपनीने ७११ क्लब विकसित केला आहे
७११ क्लबला तळघर, तळ अधिक ४ मजले अशी बांधकाम परवानगी दिली असून तेथे ७११ क्लब ही आलिशान वाणिज्य वापराची इमारत बांधण्यात आली आहे. तर पालिकेने व शासनाने आपणास सर्व परवानग्या दिल्या असून कांदळवनचा ऱ्हास केलेला नाही, असा दावा मेहता व ७११ हॉटेल्स कंपनी कडून केला जात आला आहे.

परंतु मेहता यांच्या ७११ क्लबने पालिकेने मंजूर केलेल्या नकाशा पेक्षा सुद्धा सीआरझेड व अन्य क्षेत्रात बेकायदेशीर वाढीव बांधकाम केले म्हणून आता स्वतः पालिकेनेच प्रभाग समिती क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना पत्र व नकाशा देऊन कळवले आहे.

Team Global News Marathi: