भाजपने ‘ईडी’चे वॉरंट पाठवून करोनाला अटक करणेच बाकी राहिलंय – सामना

 

मुंबई | पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जात पक्षाला टोला लगावला आहे.महाराष्ट्रासारख्या राज्यातील विरोधी पक्ष सक्षम व जागरुक आहे. त्यांनी पंतप्रधानांना भेटून व पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे करोनाग्रस्त कुटुंबाची मदत करावी असे नम्रपणे सांगायला हवं असा सल्ला सामना अग्रलेखातून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं भारतातील आरोग्य व्यवस्था व अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सूचना केल्या होत्या. करोना म्हणजे नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर करावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे आधीच मांडली आहे. करोना ही नैसर्गिक आपत्ती वगैरे नसून राज्य सरकारचे अपयश आहे, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे म्हणणे आहे. तसे असेल तर भाजपने ‘ईडी’, ‘सीबीआय’चे वॉरंट पाठवून करोना व्हायरसला अटक करणे एवढेच आता बाकी आहे,’ असा टोला सामनातून भाजपला लगावला आहे.

करोनासारख्या महामारीस नैसर्गिक आपत्तीच्या श्रेणीत समाविष्ट करता येत नसल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. त्यामुळे करोनातील मृतांना व त्यांच्या निराधार कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे सरकारला शक्य नाही व तेवढा आर्थिक भारही पेलता येणार नाही, हे सरकार म्हणत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने करोना बळींच्या कुटुंबांना अर्थसहाय्य देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच असल्याचे ठणकावले आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Team Global News Marathi: