“भाजप दाऊदला आणून मंत्री करणारा मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहे”, उद्वव ठाकरेंच्या विधानावर भाजपचा पलटवार

 

मुंबई | भाजप नेत्यांकडून सातत्याने होणारी टिका, राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याचा वाद आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आणि विरोधकांकडून सातत्याने शिवसेनेवर होणारी टिका, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याप्रमाणे मुंबईतील बीकेसी मैदानात त्यांची जोरदार सभा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली. भाजपवाले दाऊदला आणून मंत्री करतील, असा टोलाही त्यांनी लगावला. आता, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर पलटवार केला आहे.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. तर, ईडी, सीबीआय, आयटी करुन होत असलेल्या टिकांवरुनही भाजपवर निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना, दाऊदशी आर्थिक व्यवहार करणारा नेता आपल्या मंत्रिमंडळात आहे, असे म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा विसर पडला असल्याची टिकाही त्यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, भाजपा दाऊदला मंत्री करेल, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी मारला. पण ते हे विसरून गेले की, दाऊद इब्राहिमच्या टोळीला आर्थिक मदत होईल अशा रितीने त्याच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेला एक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. या नेत्याला तुरुंगात जावे लागले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे.

Team Global News Marathi: