भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग !

 

मुंबई | सध्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना वाढलेल्या दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी साकीनाका येथे घडलेल्या घाणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तसेच महिला सुरक्षितेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सुद्धा आघाडी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता थेट सत्तेत असलेल्या भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे. तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. तसेच, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

Team Global News Marathi: