राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं युती संदर्भात मोठं विधान !

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने येणाऱ्या भविष्यात मनसे-भाजपा युती होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा करत पाटलांचे विधान खोदून काढले होते. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यातच आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहचले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. तसेच ”युती झाली नाही तरी मैत्री राहील”, असं भेटीच्या आधी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.

माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होत. त्यानुसार, ही भेट होत आहे.

 

Team Global News Marathi: