मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी माध्यमांशी संबंधित प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले,’मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहायभूत ठरेल.

पुढे बोलताना कोश्यारी म्हणाले की, यात मातृभाषेच्या अभिनामासमवेत शिक्षणाचा होणारा विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तथा कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Team Global News Marathi: