नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात
बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. सत्तेवर राहूनही इतक्या वर्षांनंतर ही वेळ यावी हे बिहारच्या जनतेचे दुर्दैवच आहे. नोकरीसाठी बिहारचे मजूर महाराष्ट्रात आणि प्रचारासाठी हैदराबादचे झगमगीत रस्ते बिहारात” असा टोला आजच्या सामना अग्रलेखातून लागवण्यात आला आहे.
एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो सुरेश कुमार शर्मा यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले आणि हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले.
तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे असा चिमटा यावेळी नितीश सरकारला काढण्यात आला होता.