बिहार निवडणुकीची घोषणा, तीन टप्प्यांत होणार निवडणूक ; कोण मारणार यंदा बाजी ?

बिहार निवडणुकीची  घोषणा, तीन टप्प्यांत होणार निवडणूक ;  कोण मारणार यंदा बाजी ?
      

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा  केली आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात  निवडणूक पार पडणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सीआयसी सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा कहर सुरू असताना इतकी मोठी निवडणूक घेतली जाणार आहे.

या निवडणुकीत जेलमध्ये असलेले  राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव की मुख्यमंत्री नितीश कुमार यातील कोण बाजी मरणार हे येणाऱ्या निवडणुकीत समोर येणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपा पंतप्रधान मोदी यांच्या करिष्म्याने सत्ता मिळवणार हे येणाऱ्या निवडणुकीत समोर येणार आहे.
          
यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार पुन्हा आपला करिष्मा दाखवणार की, लालूप्रसाद यादव जेलमधून बिहारच्या राजकारणात नवा करिष्मा करून दाखवणार हा येणारा काळच ठरवेल. बिहार  निवडणुकीचा कार्यकाळ येत्या २९ नोव्हेंबरला समाप्त होत आहे.
             
या निवडणुकीत लालूप्रसाद यादव हेच किंग मेकर ठरले होते. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर राजदचा मुख्यमंत्री होण्याची पूर्ण शक्यता असतानाही लालूंनी सर्वच राजकीय निरीक्षकांना धक्का देत नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. लालूंचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला होता. दरम्यान, दोन वर्षानंतर नितीशकुमार यांनी राजदशी असलेला घरोबा तोडत थेट भाजपशी हात मिळवणी करत सवतासुभा रचला होता.

या निवडणुकीत आठ कोटी मतदार बजावणार हक्क

बिहारमध्ये मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. २०२०मध्ये एकूण ७ कोटी ७९ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे लोक कोरोनापिडीत आहे त्यांनाही मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. कोरोनाचे पेशंट अखेरच्या तासामध्ये मतदान करू शकतील.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला मतदान होणार

३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 

७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 

१० नोव्हेंबरला मतदानाची मतमोजणी केली जाणार असून निकाल जाहीर होईल.

क्रिमिनल केसबाबत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर माहिती द्यावी लागेल. 

ऑनलाईनही नामांकन पाठवू शकता

७ फेब्रुवारी २०२०मध्ये मतदारांची यादी जाहीर करण्यात आली. 

एका मतदान केंद्रावर असणार एक हजार मतदार

४६ लाख मास्कचा वापर केला जाणार

२३ लाख ग्लव्हस आणि सॅनिटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. 

६ लाख फेस शिल्डचा वापर केला जाणार

६ लाख पीपीई किटचा वापर होणार

बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७ कोटी ७९ लाख

पुरुष मतदारांची संख्या ३ कोटी ७९ लाख

महिला मतदारांची संख्या ३ कोटी ३९ लाख

१.८९ लाख ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार

सकाळी ६ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात

कोरोनाचे रुग्ण शेवटच्या तासामध्ये मतदान करू शकतात

नोव्हेंबरमध्ये बिहार सरकारचा कार्यकाळ संपत आहे. सामान्यपणे राज्य सरकारचा कार्यकाल संपण्याच्या एक ते सव्वा महिने आधी निवडणूक प्रक्रिया पार पडते. मात्र यंदा कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. तसेच निवडणुकीच्या दोन महिने आधी आचारसंहिता लागू केली जाते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: