बिहार निवडणुक निकाल वेगळ्या वळणावर; आमचे 119 उमेदवार विजयी, राजदने केली यादीच प्रसिद्ध

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनचे ११९ उमेदवार विजयी झाल्याचा दावा राजदनं केला आहे. राजदनं विजयी उमेदवारांची यादीच ट्विट केली आहे. ‘ही महागठबंधनच्या ११९ विजयी उमेदवारांची यादी आहे. रिटर्निंग ऑफिसरनं या उमेदवारांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. मात्र आता ऑफिसर त्यांना प्रमाणपत्र देत नाहीत. तुम्ही पराभूत झाला आहात, असं सांगितलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही यांची नावं विजयी म्हणून दाखवली जात आहेत,’ असं राजदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘जवळपास १० जागांवर नितीश प्रशासन मतमोजणीस उशीर करत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानात बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून सर्व डीए आणि आरओंना फोन करत आहेत. अटीतटीच्या लढतीत आमच्या बाजूनं निकाल द्या, यासाठी त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे,’ असा आरोप राजदनं ट्विट करून केला आहे.

‘नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,’ असं राजदनं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: