सांपूर महाराष्ट्र ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, तो छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो परत येतोय. होय, आम्ही बोलतोय ते ‘बिग बॉस मराठी 4’बद्दल.’बिग बॉस मराठी 4’चं काऊंटडाऊन सुरू झालंय. यंदाचा सीझन काही नव्या सरप्राईझेसह सज्ज आहे.
तसेच या सीझनमध्ये नवं घर, नवे सदस्य, नवे राडे, नवे वाद, नवी मैत्री असं सगळं काही या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे,मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर पुन्हा एकदा हा शो होस्ट करताना दिसणार आहेत.
‘ऑल इज वेल’ अशी यंदाच्या सीझनची थीम असणार आहे. यानिमित्ताने मांजरेकरांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुम्हाला कोणते स्पर्धक बघायला आवडतील? या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं. सध्या बिग बॉस मराठीचा प्रॉम सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यंदाच्या सीझनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.