देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत मोठी कपात

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत मोठी कपात

राज्यात शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या मित्र पक्षाबरोबर दुरावा घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर घरोबा करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. या निर्णयामुळे भाजपाला संख्याबळ असून सुद्धा विरोधी बाकावर बसावे लागले होते. आता त्या पाठोपाठ ठाकरे सरकरने आणखी एका धक्का विरोधकांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून आता फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्यात आले आहे, तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.

रात्री उशीरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: