ठाकरे सरकारचा दणका; फडणवीस पती पत्नींच्या सुरक्षेत कपात

मुंबई । राज्यातील नेतेमंडळीच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या सुरक्षेत कपात केली आली.

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा देखील कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अमृता यांना वाय प्लस एक्सकॉर्टसह दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यांची ती सुरक्षा कमी करून त्यांना आता एक्स दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच फडणवीस यांची कन्या दिवीजालाही पुर्वी वाय प्लस एक्सकॉर्ट सुरक्षा होती आता तिची सुद्धा सुरक्षा कमी करण्य़ात आली असून, तिला आता एक्स सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाने भाजप आक्रमक झाली असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढू नये. सरकारचा हा निर्णय कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण करीत आहे. असा आरोप भाजपने लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: