बिग बॉस मराठीच्या घरामधून योगेश जाधव आऊट !

 

बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी किरण माने यांची चांगलीच कानउघडणी केली. महेश सरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली कोण कुठे चुकले, कोण बरोबर खेळले सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले. पण यावेळेस सरांचा ओरडा नक्की कोणत्या सदस्याला मिळेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. दरम्यान बिग बॉसच्या घरातून योगेश जाधवला घराबाहेर पडावे लागले.

किरण माने यांच्या बऱ्याच गैरसमजुती महेश मांजरेकरांनी दूर केल्या. तसेच विकासाला त्याचे खेळू दे असा सल्ला देखील दिला. मांजरेकर किरण यांना बोलताना म्हणाले, ‘मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाहीये. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला’. या शब्दात त्यांना खडसावून सांगितले.

याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये वूट चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अक्षय आणि अपूर्वा किरण मानेंवर भडकल्याचे दिसून आले तर अमृता देशमुखने देखील किरण मानेंनी केलेल्या वक्त्यावर नाराजी दर्शवली. शेवटी तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे प्रत्येक सदस्याला वाटत असते. विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये आले ज्यामधून योगेश जाधवला घर सोडावे लागले.

Team Global News Marathi: